(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते कृतज्ञतापूर्व सन्मान | मराठी १ नंबर बातम्या

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते कृतज्ञतापूर्व सन्मान



 
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या
जवानांचे बलिदान सदैव प्रेरणादायी
                                                            - राज्यपाल
          
            मुंबईदि. 26 : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असेलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
            जीवन ज्योत संस्थेच्यावतीने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ताआमदार मंगलप्रभात लोढाजीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष मुरजी पटेल तसेच 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.   
            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेमी सर्वप्रथम आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या जवानांना तसेच त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा नमन करतो. बलिदान ही देशाच्याप्रती एक भावना असते. प्रत्येकाची एक आई असतेत्याचप्रमाणे भारतमाताअदृश्य माता या तीन माता प्रत्येक जवानांना शक्ती देत असतात.
            जे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी प्राणार्पण करतात ते अमर होतात. आणि हेच जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपले रक्षण करतात. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई आणि देशाचे रक्षण करून मोठे कार्य केले आहे. हे शहीद जवान वंदनीय व पूजनीय आहेत. या शहीद जवानांचे पाल्य आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करुन राज्यपालांनी शहीदांच्या कुटुंबियास पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
              26/11 हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी मुंबईवर हल्ला होऊन आपले जवान शहीद झाले त्या दिवसापासून आपण हा दिवस शहीद दिन म्हणून पाळतो.
            26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहून शहीद अशोक मारुतीराव कामटेविजय सहदेव साळसकरप्रकाश पांडुरंग मोरेबाबुराव साहेबराव धुरगुडेबाळासाहेब चंद्रकात भोसले,तुकाराम गोपाळ ओंबळेजयवंत हनुमंत पाटीलविजय मधुकर खाडेकरअरुण रघुनाथ चित्तेयोगेश शिवाजी पाटीलअंबादास रामचंद्र पवारशशांक चंद्रसेन शिंदे,मुरलीधर लक्ष्मण चौधरीराहुल सुभाष शिंदेनितेश भिकाजी जाधव यांच्या कुटुंबियांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लॅपटॉप व सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget