पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्राची दखल
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२०
‘पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँके’तील आर्थिक निर्बंध उठवून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करुन खातेदारांना दिलासा देण्यासंदर्भात जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आल्याचे मा. पंतप्रधान यांचे सह सचिव सी.श्रीधर यांनी लेखी पत्राद्वारे वायकर यांनाकळविले आहे.
आर्थिक घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँके’वर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे या बँकेत खाते असलेले पगारदार नोकर, पेंन्शनधारक, ज्येष्ठ नागरीक, सोसायट्या, उद्योजक, विधवा यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना स्वत:च्या हक्काचे पैसे काढणेही कठीण झाले आहेे. त्यामुळे ‘पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप.बँके’ वरील आर्थिक निर्बंध उठवून खातेदारांना दिलासा द्यावा, अशी विनंती रविंद्र वायकर यांनी लेखी पत्राद्वारे माननिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबर २०२० मध्ये केली होती. या अगोदरही त्यांनी अशाप्रकारचे पत्र मा. पंतप्रधान, वित्तमंत्री, आरबीआयचे गर्व्हनर यांना पाठविले आहे.
*आमदार रविंद्र वायकर यांनी २१ ऑक्टोबर २०२० मध्ये पुनश्च माननिय पंतप्रधानांना यांना पाठविलेले पत्र पंतप्रधान कार्यालयास प्राप्त झाल्याचे पंतप्रधान यांचे सहसचिव सी. श्रीधर यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी लेखी पत्र पाठवून आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा