संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. 26 : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उद्देशिकेच्या सामूहिक वाचनात सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
भारतीय संविधान हे आपल्या सर्वांसाठी गौरवशाली असे आहे. भारतीय संविधानाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे संविधान म्हणून आदराने उल्लेख केला जातो. या संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्याप्रती सदैव कृतज्ञच राहावे लागेल,असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी म्हटले आहे.
०००
टिप्पणी पोस्ट करा