(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अग्निशमन दलात ५० जवान वाहन चालक पदी बढतीच्या प्रतिक्षेत तरीही कंत्राटी पद्धतीने वाहन चालक घेण्यासाठी स्थायी समिती मध्ये प्रस्ताव | मराठी १ नंबर बातम्या

अग्निशमन दलात ५० जवान वाहन चालक पदी बढतीच्या प्रतिक्षेत तरीही कंत्राटी पद्धतीने वाहन चालक घेण्यासाठी स्थायी समिती मध्ये प्रस्ताव


आता मुख्य अग्निशमन अधिकारी पासून ते अग्निशमन जवानापर्यंत होऊ दे सर्वांची भरती कंत्राटी पद्धतीने : अग्निशमन दलात संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : अग्निशमन दलामध्ये वाहन चालकाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेऊन 50 अग्निशमन जवान बढती द्वारे वाहन चालक बनण्याच्या प्रतिक्षेत मागील दोन वर्षांपासून आहेत. मात्र त्यांना बढती न देता थेट कंत्राटी पद्धतीने 54 वाहन चालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव येत्या सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर होणार आहे. 

वाहन चालकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करून अग्निशमन दलाचे खासगीकरण करायचे असेल तर केवळ चालकचं कंत्राटी पद्धतीने न घेता मुख्य अग्निशमन अधिकारी ते जवानांपर्यंत सर्वांची भरती प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने  करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या जवांनांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई अग्निशमन दलात 33 फायर स्टेशन मध्ये 2 हजार 575 अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत. पुरुष जवानांची संख्या 1576 तर महिला अग्निशामकांची संख्या 114 आहे. याध्ये 499 वाहन चालक आहेत. तर लिडिंग फायरमनची संख्या 270 आहे. 

यामध्ये ज्या अग्निशमन जवानांकडे वाहन चालवण्याचा परवाना असतो. त्या परवानानुसार जीप वा जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन अग्निशमन जवानांना बढती देऊन त्यांना वाहन चालक पद दिले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून 50 अग्निशमन जवानांनी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असले तरी त्यांना वाहन चालक म्हणून बढती देण्यात आलेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालिकेने दोन वर्षांसाठी 54 कंत्राटी चालकांची भरती करण्याचे ठरविले असून याकरीता 5 कोटी 97 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी सादर होणार आहे.

मग, अग्निशमन दलात 50 जवानांनी वाहन चालकांचे प्रशिक्षण घेऊन ही ते गेले दोन वर्षे वाहन चालकाच्या बढतीसाठी वाट बघत असताना कंत्राटी पद्धतीने वाहन चालक का घेत आहेत, असा सवाल अग्निशमन दलातील जवान आणि वाहन चालकांनी केला आहे. 

केवळ कंत्राटी पद्धतीने वाहन चालकच नकोच सोबत मुख्य अग्निशमन अधिकारी पासून जवानांपर्यंत सर्वांची भरती आता कंत्राटी पद्धतीने करावी, अशी संताप्त प्रतिक्रिया ही अग्निशमन दलातून व्यक्त होत आहे.

अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने कामकाज करण्याची पद्धत नाही. कंत्राटी पद्धत अग्निशमन दलाच्या सुरक्षेसाठी धोका आहे. कंत्राटी पद्धतीने कामकाज चालले तर कोण स्वतःचा जीव आगीत घालून दुसरा जीव वाचवणार आहे, याचा विचार प्रशासनाने करावा, असे स्पष्ट मत जवानांनी व्यक्त केलेले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget