(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कंत्राटी वाहन चालक घेण्यास मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचा तीव्र विरोध | मराठी १ नंबर बातम्या

कंत्राटी वाहन चालक घेण्यास मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचा तीव्र विरोध



मुबंई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यासाठी केली विनंती

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन दल, हे एक शिस्तीचे खाते आहे. या दलाच्या शिस्तबद्ध व नियोजनबध्द पध्दतीमुळेच मुंबई अग्निशमन दलाच नावलौकीक जगभर प्रसिद्ध आहे. आता, अग्निशमन दलासारख्या गणवेषधारी अत्यावश्यक सेवेतही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर अनेक खात्यांप्रमाणे खाजगी (कंत्राटी) पध्दतीने वाहनचालकांची नियुक्ती होणार आहे आणि ती अंतिम टप्प्यात आहे. जगभर प्रख्यात असलेल्या अग्निशमन दलात खाजगीकरण झाल्यास अग्निशमन दलाचं नावलौकिक पूर्णतः संपुष्टात येईल, अशी भिती मुंबई अग्निशमन दल लढाऊ कागमार सेनेने व्यक्त करत रविवारी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यासाठी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कार्य सिमीत असल्यने अशा कर्मचाऱ्यांकडून आणिबाणी प्रसंगी अचानकपणे जबाबदारी झटकल्यास त्याचे थेट परिणाम जनतेच्या जिवितांवर व मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरून त्याचे थेट परिणाम जनतेच्या सेवेवर होईल. ही बाब अग्निशमन दलाच्या भविष्यासाठी दूर्देवी असून अग्निशमन दलाच्या तत्पर सेवेवर अतिशय घातकी परिमाण करतील, असे स्पष्ट मत आपल्या निवेदनात मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने व्यक्त केले आहे.

अग्निशमन दलासाठी आवश्यक असलेली तत्पर व जलद सेवा, ही खाजगीकरणाच्या माध्यमातून कधीच जनतेला उपलब्ध होवू शकणार नाही. हे आपण कोविड महामारीच्या वेळी महापालिकेच्या इतर खात्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेले आहे, असा उल्लेख ही निवेदनात करण्यात आलेला आहे.

अग्निशमन प्रशासनाकडून काळबादेवी दुर्घटनेनंतर नेमलेल्या समीतीकडून दिलेल्या अनेक शिफारशीतून फक्त कंत्राटी पध्दतीने चालकाच्या नेमणुका करण्यास अग्निशमन प्रशासन अत्यावश्यक सेवेच्या गोंडस नावाचे गैरवापर करून गांभिर्य दाखवते, याचेही अग्निशमन जवानांना नवल वाटत असून मुख्यतः या अहवालास त्याचवेळी  मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेकडून निषेध नोंदवून विरोध ही दर्शविला होता, असे निवेदनात म्हटले आहे.

अग्निशमन दलात कंत्राटी पध्दतीने वाहनचालकांच्या केल्या जाणाऱ्या खाजगी नियुक्तींस आपल्या मंजुरीने अंतिम मान्यता दिली जाणार आहे. अग्निशमन दलाच्या भविष्याच्या कार्यक्षमतेचा विचारविनिमय आपल्याकडून करून अग्निशमन दलातील सदर खाजगी (कंत्राटी) वाहनचालकांच्या नियुक्तीस आपण कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी विनंती मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनाने महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget