मुंबई : अखेर येत्या 2 मार्च पर्यंत पेन्शन सोबत प्रॉव्हिडंट फंड आणि अन्य निवृत्त सुविधांचा लाभ अग्निशमन जवानांना मिळणार आहे.
उप महापौर ऍड. सुहास वाडकर यांच्या सोबत त्यांच्या दालनात आज पेन्शन विभाग सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि त्रस्त अग्निशमन जवान यांची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 2 मार्च पर्यंत पेन्शन सोबत प्रॉव्हिडंट फंड आणि अन्य निवृत्त सुविधांचा लाभ अग्निशमन जवानांना मिळेल, असे ठरल्याचे उप महापौर वाडकर यांनी सांगितले.
त्यामुळे उभं आयुष्य आगीशी झुंज देणाऱ्या अग्निशमन जवानांना अखेर दोन वर्षांनी न्याय मिळाला आहे. गेल्या दोन वर्षात 40 जणांना निवृती पेन्शन सोबत अन्य निवृती सुविधांचा लाभ मिळाला नव्हता. यामागे काही त्रुटी व तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करून येत्या 2 मार्च पर्यंत निवृत्त अग्निशमन जवान त्यांच्या निवृत्ती सुविधांचा लाभ मिळेल, असे वाडकर यांनी स्पष्ट केले.
यासंबंधीचे वृत्त मराठी १ नंबर बातम्या ने वेळोवेळी प्रकाशित केलेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा