(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आयुष्यभर आगीशी झुंज देणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवांनाना दोन वर्षे उलटूनही पेन्शन सोबत प्रॉव्हिडंट फंड व अन्य सुविधांचा लाभ नाही | मराठी १ नंबर बातम्या

आयुष्यभर आगीशी झुंज देणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवांनाना दोन वर्षे उलटूनही पेन्शन सोबत प्रॉव्हिडंट फंड व अन्य सुविधांचा लाभ नाही

मुंबई : उभं आयुष्य आगीशी झुंज देत लोकांचे जीवन वाचविणारे अग्निशमन दलाचे जवान निवृत्त होऊन दोन वर्षे उलटले तरी त्यांना प्रॉव्हिडंट फंड सोबत अन्य निवृत्ती सुविधांचा लाभ मिळालेला नाही. सोबत निवृत्ती नंतर पेन्शन हा एकमेव जीवन जगण्याचा आधार असतो, तो ही हेरावून घेण्याचे काम प्रशासनाने केलेले आहे.

आयुष्यभर आगीशी झुंज देत लोकांना आगीतून वाचवायचे आणि निवृत्ती नंतर प्रशासनाने आम्हालाचं असं वाऱ्यावर सोडायचे, हे योग्य आहे का, असा सवाल अग्निशमन दलाच्या जवांनानी केला आहे.

मागील तीन वर्षांपासून अग्निशमन दलातून जवळपास 30 अग्निशमन जवान निवृत्त झाले. त्यांना निवृत्ती नंतर नियमाने पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड सोबत अन्य निवृत्तीचे लाभ मिळतात. मात्र गेल्याचे तीन चार वर्षांपासून अग्निशमन दलाचा जवान निवृत्त झाल्यावर ना पेन्शन मिळत आहे ना निवृत्ती चा अन्य कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत आहेत. स्वतः च्या पगारातून जमा केलेले प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम ही मिळत नाही. याकरिता प्रशासनाच्या पायऱ्या झिजवून ही काहीच फायदा झालेला नाही, अशी माहिती त्रस्त निवृत्त जवानांनी सांगितले.

*अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना वेळेवर निवृत्ती सुविधांचा लाभ मिळतो.

आम्हाला आज आमच्याच हक्काचा पैसा मिळविण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी ते पालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तरीही आम्हाला निवृत्ती नंतर एक ही पैसाचा लाभ मिळत नाही, तो पैसा ही आमच्या हक्काचा असूनही, मग अग्निशमन अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्या झाल्या सगळ्या सुविधा म्हणजे पेन्शन पासून प्रायव्हेट फंड वा अन्य सुविधा त्वरीत मिळतात. मग आम्हाला एक न्याय आणि अधिकाऱ्यांना दुसरा न्याय असं का, दोन्ही ही आगीशीच झुंज देतात ना, असा सवाल निवृत्त झालेल्या अग्निशमन जवानांनी केला आहे.

*मुलांमुलींची लग्न करणे, हे एकमेव स्वप्न ही पूर्ण करता येत नाही

आम्हा मराठी माणसांना निवृत्त झाल्यावर जो निवृत्तीचा पैसा मिळतो त्यातूनच आम्ही आमच्या मुलांमुलांची लग्न करतो. पण आज स्वतः च्या हक्काचा प्राइव्हेंट फंड ही मिळत नाही. म्हणजे आज आम्ही इमानाने नोकरी करून गुन्हा केला का, असा सवाल निवृत्त अग्निशमन जवनानांनी केला.

*एक दमडी नाही हातात कस जगायचं सांगा

निवृत्त झाल्यापासून ना पेन्शन मिळाली आहे ना स्वतः च्या पगारातून काटकसर करत जमा केलेला प्राइव्हेंट फंड ही मिळालेला नाही. तुम्हीचं सांगा आम्ही किती दिवस लोकांकडे हातापाया पकडून कर्ज काढत जगायचं, असा भावूक सवाल निवृत्त जवांनानी केला आहे. 

दरम्यान, निवृत्ती नंतर त्वरित पेन्शन वा अन्य सुविधा न देण्यामागील कारण असे सांगितले जाते की, ज्या मनपा वसाहतीत अग्निशमन दलाचे जवान राहतात, तेथील शिल्लक घर भाडे वा थकीत वीज बिल वसूल होत नाही तोवर त्यांना निवृत्ती नंतरचे लाभ त्वरित दिले जात नाही. 

मात्र जवानांच्या निवृत्ती वेतनातून त्वरित थकीत घर भाडे वा वीज बिल रक्कम वजा करून त्यांना प्राइव्हेंट फंड आणि अन्य सुविधा सोबत पेन्शन त्वरित सुरू करण्यास काही हरकत नाही, असे एका अग्निशमन जवानाने सांगितले. 

जवान निवृत्त होण्याच्या एका वर्षा आधीच त्याच्या थकीत बिलाची माहिती घेऊन त्याच्या निवृत्ती वेतनातून रक्कम कमी करता येऊ शकते. त्याकरिता त्यांची दोन वर्षे पेन्शन न देणे, प्राइव्हेंट फंड सोबत अन्य सुविधांचा लाभ न देणे योग्य नाही, असेही मत अग्निशमन दलातील जवांनानी व्यक्त केले. 

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget