(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वर्षभरानंतर राणीबागेत आलेल्या पर्यटकांना बंगाली टायगरची डरकाळी ऐकायला मिळाली | मराठी १ नंबर बातम्या

वर्षभरानंतर राणीबागेत आलेल्या पर्यटकांना बंगाली टायगरची डरकाळी ऐकायला मिळाली

आज दिवसभरात 1419 पर्यटकांनी राणीबागेला दिली भेट

मुंबई :  राणीबागेचे दरवाजे आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आणि वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर बंगाली टायगरची डरकाळी ऐकायला मिळाली.

वर्षाभरापूर्वी राणीबागेत बंगाली टायगर आणण्यात आले होते. पण मार्च महिन्यात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे राणीबागेचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. हे दरवाजे आज खुले झाले आणि आज दिवसभरात 1419 पर्यटकांनी भेट देत सोशलदिस्टन्डचे नियम पाळत येथील बंगाली टायगर, बिबटे वाघ, कोल्हा, तरस, अस्वल, हरण, पेंग्विन आणि पाणघोडे पाहिले. पर्यटकांना केवळ पाणपक्षी पाहण्यास मिळाले नाही. याबाबत येथील संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, पाणपक्षी यांच्या निवासस्थानांचे काम सुरू आहे हे काम लवकरच पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना पाणपक्षी पाहण्यास मिळतील.

दररोज राणीबागेत 3 हजार ते 4 हजार पर्यटक भेट देत असतात हा आकडा रविवारी व सुट्टीच्या दिवशी 10 हजार पर्यंत जातो, अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली.

पर्यटकांचे केले गेले स्वागत

आज वर्षभरानंतर राणीबागेचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर आज येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने केले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget