(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लॉकडाऊन करायची आवश्यकता भासणार नाही - अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी | मराठी १ नंबर बातम्या

लॉकडाऊन करायची आवश्यकता भासणार नाही - अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासू शकते असे म्हटले जात असले तरी येणाऱ्या काळात लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, असे स्पष्ट मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना रुग्णाची आकडेवारी पाहता ही आकडेवारी गंभीर आहे असे म्हणता येणार नाही. ही आकडेवारी प्रत्येक दिवशी बदलत आहे. केवळ एकाच दिवशी ही आकडेवारी 634 पर्यंत गेली होती. पण नंतर पुन्हा ही संख्या कमी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे काकाणी म्हणाले. 

सध्या कोरोनाच्या संख्येत जी वाढ होते, त्यामागे लोकलचा प्रवास हे एकमेव कारण यामागील आहे असे म्हणता येणार नाही. सध्या परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढल्याने, ते सुद्धा कारण असल्याचे शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, येत्या आठवड्याभरात कोरोनाच्या संख्येचा आढावा घेऊन शाळा उघडण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी निष्काळजीपणा न करता मास्कचा वापर करणे, हाताची स्वच्छता राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे काकाणी यांनी सांगितले. जे मास्कचा वापर करत नाही, त्यांच्यावर पालिकेतर्फे कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget