मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त दिनेश जाधव यांचे 19 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.30 वाजता वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर , स्वामी विवेकानंद मार्ग , विलेपार्ले ( पश्चिम ) येथिल स्मशानभूमिमध्ये आज 20 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .
एक कार्यक्षम अधिकारी आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिनेश जाधव सर्वदूर परिचित होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे . राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार डॉ नरेंद्र जाधव यांचे ते ज्येष्ठ बंधू होत . दिनेश जाधव यांचे मोठे बंधू दिवंगत जे डी जाधव हे पालिका आयुक्त होते.
टिप्पणी पोस्ट करा