(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); यूकेच्या महिला मंत्री श्रीमती एलिझाबेथ ट्रस यांच्यासह शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास दिली भेट | मराठी १ नंबर बातम्या

यूकेच्या महिला मंत्री श्रीमती एलिझाबेथ ट्रस यांच्यासह शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास दिली भेट


मुंबई : यूनायटेड किंग्डमच्या महिला व समानता मंत्री तथा आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव श्रीमती एलिझाबेथ ट्रस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आज (दिनांक ९ फेब्रुवारी २०२१) सायंकाळी भेट दिली. राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदी ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी श्रीमती ट्रस व त्यांच्या सहकाऱयांचे स्वागत केले. यूनायटेड किंग्डमसोबतचे व्यापार, वाणिज्यिक संबंध आणखी दृढ करण्याविषयी चर्चा करण्यासह महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक पुरातन वारसा असलेली इमारत पाहण्यासाठी श्रीमती ट्रस यांनी ही भेट दिली.

श्रीमती ट्रस यांच्यासमवेत यूनायटेड किंग्डमचे दक्षिण आशिया व्यापार आयुक्त तथा पश्चिम भारतासाठीचे ब्रिटिश उप उच्चायुक्त श्री. ऍलन गिमेल हेही उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा श्रद्धा जाधव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्रीकांत शेट्ये, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी, श्रीमती ट्रस व श्री. गिमेल यांचे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागत केल्यानंतर त्यांना ऐतिहासिक इमारतीची माहिती देण्यात आली. मुख्यालयाच्या अंतर्गत असलेला सोनेरी घुमट तसेच महानगरपालिका सभागृहाची या शिष्टमंडळाने पाहणी केली. त्यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पुरातन वारसा तज्ज्ञ भरत गोठोस्कर यांनी ऐतिहासिक माहिती विशद केली तसेच इमारतीचे वैशिष्ट्य उलगडून दाखवले.

यानंतर महानगरपालिका आयुक्त दालनात या शिष्टमंडळाने मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा केली. मुंबईसह महाराष्ट्र राज्यासमवेत यूनायटेड किंग्डमचे वाणिज्यिक व व्यापार विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह नवीन संधी शोधून त्यास बळकटी देण्यावर द्विपक्षीय सहमती झाली. 

श्रीमती ट्रस यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्नेहाचे प्रतीक म्हणून साडी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका बोधचिन्ह असलेले पदक व नागरी दैनंदिनी (डायरी) प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते या शिष्टमंडळाचा सत्कार करण्यात आला.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget