(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नागरिकांमध्ये कोरोना बाबतच्या जनजागृतीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला भायखळा ते सीएसटी तसेच सीएसटी ते सांताक्रुज स्टेशनपर्यंत लोकलने प्रवास | मराठी १ नंबर बातम्या

नागरिकांमध्ये कोरोना बाबतच्या जनजागृतीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला भायखळा ते सीएसटी तसेच सीएसटी ते सांताक्रुज स्टेशनपर्यंत लोकलने प्रवास


मुंबई : सद्यस्थितीत मुंबईतील काही विभागांमध्ये वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (१७ फेब्रुवारी २०२१) भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रूझ स्टेशनपर्यंत धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्रवाश्यांना कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचे महत्व पटवून दिले.

 महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना  रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, नागरिकांमध्ये अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. यासोबतच लोकलमध्ये बघितल्यानंतर ९० टक्के लोकांनी मास्क घातले होते तर १० टक्के लोकांनी मास्क घातले नसल्याचे आढळून आले असल्याचे महापौरांनी सांगितले.  नागरिक बेजबाबदारपणे वागत असून  याचा फटका इतर नागरिकांना बसत असल्यामुळे स्वतःहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे प्रत्येकाने आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे यापुढे मास्क न घातलेले नागरिक आढळून आल्यास त्यांचा फोटो घेऊन ते संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल, जेणेकरून त्यांच्यावर सक्त कारवाई होऊन नागरिकांमध्ये चांगला संदेश देण्यास मदत होऊ शकेल, असे महापौरांनी सांगितले. मुंबईकर नागरिकांनी आतापर्यंत चांगली साथ दिली असून यापुढेही नागरिकांकडून चांगली साथ मिळणे अपेक्षित असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी याप्रकारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे  या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget