४७३ कोरोनामुक्त
४ जणांचा मृत्यू
मुंबई : गुरूवारी कोरोनाचे ७३६ रूग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुकत झालेल्यांची संख्या ४७३ आहे. त्यामुळे एकूण बाधित रूग्ण संख्या ३ लाख १६ हजार ४८७ आहे. कोरोना मुकत झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार ९९५ आहे. मुंबईतील सक्रीय रूग्ण संख्या ६२०१ असून ते विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज ४ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ११ हजार ४३० एवढी आहे.
मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर ९४ टकके आहे. आठवडाभराचा कोविड वाढीचा दर ०.१७ टकके आहे. मार्च पासून आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांची संख्या ३० लाख ८० हजार ५२८ आहे.
टिप्पणी पोस्ट करा