(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शिक्षक परिषद मुंबई विभागाचा वार्षिक अधिवेशन सोहळा संपन्न | मराठी १ नंबर बातम्या

शिक्षक परिषद मुंबई विभागाचा वार्षिक अधिवेशन सोहळा संपन्न


मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वतीने शिक्षकांचे वार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक १३/०२/२०२१ रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत दामोदर हॉल परळ मुंबई येथे उत्साहपूर्वक पद्धतीने पार पडले या अधिवेशनात कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत ऍड.आशिष शेलार साहेब यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण,ऑफलाईन शिक्षण,तसेच शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर यांच्या हिताच्या गोष्टीचे विचारमंथन असे विविध विषय चर्चिले गेले.सदर अधिवेशनास,शिक्षक आमदार नागो गाणार,मा.शि.आ.संजीवनीताई रायकर मुंबई,मा.शि.आमदार भगवानराव साळुंखे पुणे,राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू,सर कार्यवाह नरेंद्र वातकर,कोषाध्यक्ष किरण भावठाणकार,मुंबई अध्यक्ष उल्हास वदोडकर,कार्यवाह शिवनाथ दराडे,राज्य सयोंजक निरंजन गिरी रा.वि. यांच्या उपस्थितीत एकूण १२ ठराव मंजूर करण्यात आले,व त्या सर्व ठरावाना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सदर ठराव पुढीलप्रमाणे :-


१)७ व्या वेतन आयोगातील त्रुटी बक्षी समितीच्या शिफारशींचा अवलंब करून दूर करण्यात याव्या.

२)नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

३)१०-२०-३० वर्ष सेवेची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू करावी.

४)शिक्षकांसाठी बिना रोखीचे वैद्यकीय बिमा योजना(cashless mediclaim)लागू करण्यात यावी.

५)कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची पदे एकूण विद्यार्थी संख्येवर न देवता पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावी,पात्र शिक्षकांना A.M वेतनश्रेणी त्वरित द्यावी.

६)शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत.

७)वरिष्ठ/निवड वेतन श्रेणीसाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्या.

८)मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना पुढील ३ वर्ष त्याच शाळेत ठेवावे व विद्यार्थी संख्या वाढवण्याची संधी द्यावी.

९)मुंबईतील अनुदानित शाळेतील विद्यार्थी संख्या सतत कमी होत असल्याने त्यांना सरंक्षण देण्यासाठी संच मान्यतेचे विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करावे.

१०)केंद्राच्या धर्तीवर महिला शिक्षकांसाठी २ वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी.

११)रात्र शाळेत सेवेत असलेल्या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून मान्य करावे.

१२)महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यासंबधीच्या शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे.

असे सर्व ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

शिक्षकांच्या मुंबई विभागातील अधिवेशनाच्या अनुषंगाने शिक्षकांची सहविचार सभा,आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार,शिक्षकांच्या विविध शैक्षणिक स्पर्धामधील विजयी शिक्षकांचे पारितोषिक वितरण सोहळा अधिवेशनाच्या दिवशी साजरा करण्यात आला.अधिवेशनात सुमारे ३००हुन अधिक शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली,सदर अधिवेशनात राज्य शासनाच्या कोविड-१९ रोगाच्या प्रदूर्भावापासून बचावात्मक उपाययोजनेचे काटेकोर पालन करण्यात आले.उपस्थित सर्व मुंबई विभागातील शिक्षकांचे व मान्यवरांचे शिक्षक परिषदेच्या वतीने,मुंबई अध्यक्ष उल्हास वडोदकर,कार्यवाह शिवनाथ दराडे,गणेश नाकती,आनंद शर्मा,प्रकाश मिश्रा,सयोंजक निरंजन गिरी,श्रीम.शारदा पाटील,श्रीम.तिवरेकर मॅडम,श्रीम.सुनेत्रा तांबे,सह कार्यवाह रा.वि.संतोष धावडे,श्री.मनाली पाटणकर,सह कार्यवाह संजय कामथेकर,वैशाली नाडकर्णी,रवींद्रनाथ सिंह,नरेश धोत्रे, बाबासाहेब कदम यांनी आभार व्यक्त केले आहे.




Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget