(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई कामांना फेब्रुवारी अखेर होणार सुरुवात | मराठी १ नंबर बातम्या

महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई कामांना फेब्रुवारी अखेर होणार सुरुवात


*२९२ कि.मी. लांबीच्या मोठ्या नाल्यांच्या सफाई कामांना मा. स्थायी समितीची मंजुरी*

*पावसाळ्यापूर्वी ७५%, पावसाळ्यात १५%, तर पावसाळ्यानंतर १०% सफाई*

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय उपाययोजना सातत्याने अंमलात आणत असते. याच अंतर्गत महापालिका क्षेत्रातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. मोठ्या नाल्यांची साफसफाई करताना साधारणपणे पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यादरम्यान १५ टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के याप्रमाणे कामे केली जातात. येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणा-या नालेसफाई कामांना यंदा फेब्रुवारी अखेर सुरुवात करण्यात येणार असून यासाठी रुपये १५२.२५ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. या संबंधित कार्यादेश देण्यास मा. स्थायी समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान मंजुरी प्रदान केली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.  

...

वरीलबाबत महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागात अंदाजे ३२ कि. मी. लांबीचे मोठे नाले असून यांच्या साफसफाईसाठी रुपये १२.१९ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तर पूर्व उपनगर भागात असणा-या मोठ्या नाल्यांची सुमारे १०० कि. मी. असून यांच्या साफसफाईसाठी रुपये २१.०३ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांमध्ये असणा-या सुमारे १४० कि. मी. लांबीच्या मोठ्या नाल्यांच्या साफसफाईकरिता रुपये २९.३७ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.

..

तसेच शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणा-या सुमारे २० कि. मी. लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत कार्यादेश देण्यास देखील मा. स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली असून, यासाठी रुपये ८९.६६ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीची साफसफाई करताना गाळाच्या एकूण परिमाणाच्या ८० टक्के साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी व उर्वरित २० टक्के साफसफाई ही पावसाळ्यानंतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे.   

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget