मुंबई : मुंबईत पावसाचे पाणी साचू नये, याकरिता पर्जन्यजल निस्सारण वाहिनीची स्वच्छता राखणाऱ्या कंत्राटी कामगारांनी किमान वेतनाप्रमाणे पूर्ण वेतन आणि थकबाकी मिळावी तसेच अशी मागणी केली असता कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर परत घेण्यासाठी दादर येथील पर्जन्यजल निस्सारण कार्यलयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून 68 कंत्राटी कामगार काम पालिकेच्या पर्जन्यजल निस्सारण विभागात काम करत आहे. किमान वेतन मिळावे याकरिता पुकारण्यात आलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनाला 135 दिवस उलटले आहेत. तरी अद्यापही कामगारांना न्याय मिळालेला नाही. उलट किमान वेतनाची मागणी करणाऱ्या 16 कंत्राटी कामगारांना पाच महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
विशेष करून, महाराष्ट्र सरकारने २४ फेबुवारी २०१५ रोजी जाहीर केलेल्या किमान वेतन लागू करण्याच्या परिपत्रकास २४ फेबुवारी २०२१ रोजी सहा वर्ष झाले तरी परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने आजही कामगारांना किमान वेतन मिळलेले नाही, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे चिटणीस विजय दळवी यांनी सांगितले.
------
अधिकाऱ्यांचे केले तोंड गोड
राज्य शासनाच्या किमान वेतन लागू करण्याच्या परिपत्रकास २४ फेबुवारी २०२१ रोजी सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना मिठाई वाटून त्यांचे तोंड गोड केले. मात्र अद्यापही परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नाही.
टिप्पणी पोस्ट करा