दोनजण किरकोळ जखमी
मुंबई : गोरेगाव स्थानकाच्या पश्चिमेला ए4का साडीच्या दुकानाला आज सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग आजूबाजूला लागून असलेल्या चार पाच दुकानांना ही लागली. अग्निशमन दलाने दुपारी साडेबाराच्या आगीवर सुमारास नियंत्रण मिळविले. आगीत दोनजण किरकोळ जखमी झाले. अनिल कुमार (३०) याच्या पाठीला किरकोळ मार लागला असून त्यांना कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अमृत गायकवाड (४०) या इसमाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही.
टिप्पणी पोस्ट करा