आर्णी नगरपरिषद :
मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी
आठ दिवसाच्या आत पूर्ण करणार
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, मार्च दि. 2 : आर्णी (जि.यवतमाळ) नगरपरिषदेमध्ये मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करुन चौकशीत आढळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करु, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार आर्णीचे तहसिलदार यांनी तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन चौकशी पूर्ण करण्याचे व अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, भास्कर जाधव, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा