महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम महिन्याअखेर पूर्ण करणार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, मार्च दि. 2 : यवतमाळ जिल्ह्यातील महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार असून रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार होण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
सदस्य मदन येरावार यांनी महागांव ते फुलसांगवी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, हे काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत करण्यात येत आहे. अमरावती येथील अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली आहे. राज्याला केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत 6 हजार 216 कोटी रुपये प्राप्त झाले असून राज्यात 6 हजार 625 रुपयांची कामे झाली आहे. केंद्र शासनाकडून 409 कोटी रुपये अप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा