(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सन 2021-22 अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये | मराठी १ नंबर बातम्या

सन 2021-22 अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये 

महिलांसाठी

·       राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गतगृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावरझाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.

·       ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्यपरिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोयउपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले योजनाशासनाकडून राज्य परिवहन महामंडळासपर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी  हायब्रीड बसउपलब्ध करून देणार.

·       मोठया शहरातील महिलांना प्रवासासाठी तेजस्विनीयोजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.

·       महिला  बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हावार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखून ठेवण्याचानिर्णय.

·       राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्रमहिला गट स्थापन करणार.

आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांवर भर

·       आरोग्य संस्थांचे बांधकाम  श्रेणीवर्धनासाठी 7 हजार500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्णकरण्यात येईल.

·       महानगरपालिकानगरपरिषदा  नगरपंचायतींमध्येदर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटीरुपये उपलब्ध करुन देणारत्यापैकी 800 कोटी रुपयेयावर्षी.

·       कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150रूग्णालयांमध्ये सुविधा.

·       सिंधुदूर्गउस्मानाबादनाशिक, रायगड आणि सातारायेथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेअमरावती परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यातयेणार.

·       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 11शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रुपांतर. 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडूनभौतिकोपचार  व्यवसायोपचार महाविद्यालयांचीस्थापना

·       जिल्हा रूग्णालयामध्ये  वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये,पोस्ट कोविड काउन्सिलींग   ट्रीटमेंट सेंटर

·       सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी  1 हजार941 कोटी 64 लाख रुपये तरतूद.

शाश्वत कृषी विकासासाठी

·       तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्केव्याजाने कर्जपुरवठा

·       कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरणकरण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.

·       शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीतामहावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल.

·       थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूटऊर्वरितथकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंतकेल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ.

·       शेतमालाच्या बाजारपेठ  मूल्यसाखळ्यांच्यानिर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजितकिंमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय  ग्रामीणपरिवर्तन प्रकल्प .

·        प्रत्येक तालुक्यात किमान एकयाप्रमाणे सुमारे 500नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपालारोपवाटिका स्थापन करणार.

·       राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.

·       शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठीशेळीपालनकिंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेचकंपोस्टींगकरता अनुदान.

·       कृषीपशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय  मत्स्यव्यवसायविभागास 3 हजार 274 कोटी रुपये नियतव्यय

जलसंपदा

·       जलसंपदा विभागास 12 हजार 951 कोटी रुपयेनियतव्यय प्रस्तावित.  

आपत्ती नियोजनासाठी मदत  पुनर्वसन

·       मदत  पुनर्वसन विभागास 11 हजार 454 कोटी 78लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित

पायाभूत सुविधांच्या विकासावर भर-रस्ते विकास

·       नांदेड ते जालना या  200 किलोमीटर लांबीचे 7 हजारकोटी रूपये अंदाजित रकमेचे  द्रुतगती जोड महामार्गाचेनवीन काम.

·       पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोडउभारणी, 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रूपयेअंदाजित किंमत.

·       रायगड जिल्हयातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्हयातीलरेड्डी या 540 किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्याकामासाठी 9 हजार 573 कोटी खर्च अपेक्षित आहे.

·       ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्तेविकासाची 40 हजार किलोमीटर लांबीची कामे हातीघेणार. 10 हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी. 1हजार 700 कोटी रुपयाची तरतूद             

प्रवासाचा मार्ग सुकर

·       पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद  रेल्वे मार्गाचे कामहाती घेण्यास मान्यताप्रस्तावित लांबी 235 किलोमीटर,गती 200 किलोमीटर प्रतितासअपेक्षित खर्च 16 हजार39 कोटी रुपये.

·       राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी विद्युत बसेसमध्ये रूपांतर   बसस्थानकांचेआधुनिकीकरणासाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचानियतव्यय प्रस्तावित.     

ग्रामविकासातून राष्ट्र विकास

·       प्रधानमंत्री आवास योजनारमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाखरूपये उपलब्ध करुन देण्यात येतील.

शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन

·       शासकीय  जिल्हा परिषद शाळांच्या जीर्णावस्थेतीलइमारतींची पुनर्बांधणी  दुरुस्ती करण्याकरीता 3 हजारकोटी रुपयांचा आराखडा तयार.

·       प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्येअत्याधुनिक राजीव गांधी विज्ञान  तंत्रज्ञान पार्कस्थापन करण्याचा निर्णयएकूण 300 कोटी रुपये खर्चअपेक्षित.

·       महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना येत्यामहाराष्ट्र दिनी सुरू करण्यात येणारदोन लाख युवाउमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगारसंधी.

·       सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिवराज्य सुंदर ग्राम अभियानराबविण्यात येणारउत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनापुरस्कार.

मुंबईच्या विकासाचे प्रकल्प

·       सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी - न्हावा शेवा प्रकल्प पूर्णकरण्याचे नियोजनवरळी ते शिवडी उड्डाणपूलाचे कामसुरु,3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.

·       40 हजार कोटी रूपये किंमतीच्या, 126 कि.मी.लांबीच्याविरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर च्याभूसंपादनाचे काम सुरु.

·       15 किलोमीटर लांबीचा ठाणे कोस्टल रोडचीउभारणी सुरु, हजार 250 कोटी  रूपये खर्च अपेक्षित.

·       वसई  ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरूकरण्यात येणार.  

प्रवासासाठी दळणवळण सुविधा-

·       वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे 17.17 किलोमीटरचे 11हजार 333 कोटी रूपये किंमतीचे काम सुरुवांद्रे-वर्सोवा-विरार सागरी सेतू, किंमत 42 हजार कोटी रूपये प्रकल्पअहवाल तयार करण्याचे काम सुरु.

·       गोरेगाव - मुलुंड लिंकरोड,किंमत 6 हजार 600 कोटीरुपये,निविदाविषयक कार्यवाही सुरू

·       कोस्टल रोड प्रकल्पाचे काम  प्रगतीतसन 2024 पूर्वीपूर्ण करणार.

मुंबईतील पर्यटन आकर्षणे

·       हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यास्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता

मुंबई येथील पायाभूत विकास प्रकल्प

·       वरळीवांद्रेधारावीघाटकोपरभांडूपवर्सोवा मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय,19 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित

·       मिठी,दहिसरपोईसर  ओशिवरा नद्या पुनरुज्जीवीतकरण्याची कामे  सुरु.

25 हजार उद्योगांना उभारी देणार

·        मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे उद्दिष्टवाढवून यावर्षी 25 हजार उद्योग घटकांना मदत करण्याचेउद्दीष्ट.

·       एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिककारागिर , मजूर  कामगारांना कौशल्य वर्धनासाठी सहाय्यकरून  त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय,राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार

·       नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गमुंबई-पुणे द्रुतगतीमहामार्ग  मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा  इलेक्ट्रीकव्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार

कामगार

·       संत जनाबाई सामाजिक सुरक्षा  कल्याण योजनेतूनअसंघटित कामगारांची नोंदणी  सामाजिक सुरक्षा कल्याणासाठी समर्पित कल्याण निधी ,बीजभांडवल250 कोटी रुपये.

·       जव्हार येथे गिरीस्थान पर्यटनस्थळ विकसित करण्यातयेणार

·       वरळी दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीयदर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी  जागाहस्तांतरणाची प्रक्रिया   सविस्तर प्रकल्प अहवाल तयारकरण्याचे काम सुरु.

·       पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपयेखर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित

·       राज्यातील धूतपापेश्वर मंदिर (ता.राजापूर,जि.रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर,खिद्रापूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर), एकविरा माता मंदिर,कार्ले(ता.मावळ,जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता.सिन्नर,जि.नाशिक), खंडोबा मंदिर,सातारा (ता.जि.औरंगाबाद),भगवान पुरुषोत्तम मंदिरपुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव,जि.बीड), आनंदेश्वर मंदिर,लासूर (ता.दर्यापूर,जि.अमरावती), शिव मंदिरमार्कंडा (ता.चामोर्शी,जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन  संवर्धन करण्यासाठी101 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

सामाजिक न्याय  विशेष सहाय्य

·       अनुसुचित जाती  नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठीप्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता 6 वीपासून सीबीएस.अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार.

·       दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल,असे वेब ॲप्लीकेशन तयार करण्यात येणार.

·       तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवलयोजना.

·       स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळालानिधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊसगाळपानुसार प्रतिटन 10 रुपये आकारुन तेवढाचा निधीशासनाकडून देण्यात येणार.   

आदिवासी विकास

·       100 शासकीय आदिवासी आश्रमशाळांचे मॉडेलनिवासी शाळांमध्ये रूपांतर

·       रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातीलजांभुळपाडा येथे पथदर्शी तत्वावर कातकरी समाजाचीएकात्मिक वसाहत.

इतर मागास बहुजन कल्याण

·       महाज्योती,सारथी  बार्टी या संस्थांना प्रत्येकी 150कोटी रुपये,श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळासाठी 100 कोटी रुपये,शामराव पेजेकोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास 50कोटी रुपये,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणिविकास महामंडळास 100 कोटी रुपये,वसंतराव नाईकविमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला 100कोटी रुपयेमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिकविकास महामंडळास 200 कोटी रुपये एवढा निधीउपलब्ध करुन देणार.

·       विमुक्त जाती(), भटक्या जमाती(), भटक्याजमाती(), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासप्रवर्गातील लाभार्थींकरीता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेघरकुल योजना राबविण्याचे प्रस्तावित.

·       औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्याकरीता 3हजार 487 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित.

तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारके

·       श्री क्षेत्र परळी वैजनाथ (ता.परळी,जि.बीड), श्री क्षेत्रऔंढा नागनाथ (ता.औंढाजि.हिंगोली), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर(ता.त्र्यंबकेश्वरजि.नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.खेड,जि.पुणेया तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरीता विशेष निधीउपलब्ध करुन देण्यात येणार.

·       श्री क्षेत्र जेजुरी गड  (ता.पुरंदरजि.पुणे), श्री क्षेत्रबिरदेव देवस्थानश्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता.इंदापूर,जि.पुणे), आरेवाडी  (ता.कवठेमहांकाळजि.सांगलीयातीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांकरीताही निधी उपलब्धकरून देणार

·       श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर (ता.तिवसा,जि.अमरावती), संत गाडगेबाबा निर्वाणभूमीवलगांव(ता.जि.अमरावतीयेथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरीतानिधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

·       श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड (ता.कळवण,जि.नाशिक), संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर,त्र्यंबकेश्वर(ता.त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक), श्री क्षेत्र भगवानगड(ता.पाथर्डी,जि.अहमदनगर), श्री क्षेत्र नारायण गड आणिश्री क्षेत्र गहिनीनाथ गड (ता.पाटोदा,जि.बीडयातीर्थक्षेत्रांच्या  विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यातयेणार.

·       मोरगावथेऊररांजगणगावओझरलेण्याद्री,महाड,पाली तसेच सिध्दटेक या श्रध्दास्थानांच्याविकासासाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासकार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

·       संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसीनामदेव (ता.जि.हिंगोलीया तीर्थक्षेत्राच्या विकासआराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

·       संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थमंगळवेढा,जि.सोलापूर येथे स्मारक उभे करण्यासाठी सन2021-22 मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यातयेणार.

·       श्री क्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा,जि.वाशिमविकासआराखड्याची कामे पूर्ण करण्याकरीता आवश्यक तो निधीउपलब्ध करून देणार.

पत्रकार सन्मान

·       बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये 10कोटी रुपयांची भर

·       राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांचा कायापालटकरण्यासाठी सुंदर माझे कार्यालय हे अभियानराबविण्यात येणार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांनापुरस्कार.

,

राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी

विधानपरिषदेत सादर केला अर्थसंकल्प

 

             राज्याचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प विधानपरिषदेत सादर केला. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन त्यांनी अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात केली. सुमारे दिड तास चाललेल्या अर्थसंकल्प वाचनाद्वारे त्यांनी राज्याच्या सर्वांगिण विकासाचे चित्र सादर केले. संकटापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाहीआणि संकटकाळात कधी मागे हटला नाही. कोरोनाकाळातही सर्वांनी मिळून या संकटाचा सामना केलाअसे ते म्हणाले.

             जगद्‌गुरु संत तुकारामांच्याजोडोनिया धनउत्तम वेव्हारे’ या अभंगातील ओळींचा उल्लेख करुन राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले कीसर्वांच्या सहभागातून यापुढेही राज्याला प्रगतिपथावर गतिमान करण्यात येईल. जिंदगी की असली उडान बाकी है,जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी हैअभी तो नापी है मुठ्टी भर जमीन हमनेअभी तो सारा आसमान बाकी है’ या शायरीद्वारे त्यांनी अर्थसंकल्प वाचनाचा समारोप केला.

0000000


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget