(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोरोनामुळे निर्बंधाची होळी | मराठी १ नंबर बातम्या

कोरोनामुळे निर्बंधाची होळी



कोरोनाचे संकट पहाता लोकांना एकत्र येण्यास बंदी

मुंबई : गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने यंदा होळी व रंगपंचमी उत्सव साजरा करताना निर्बंध असणार आहेत.

रविवार २८ मार्चला होलिकात्सव व रंगपंचमी २९ मार्चला आली आहे. परंतु कोरोनाचे संकट लक्षात घेता खाजगी व सार्वजनिक ठिकाणी यंदा होलिकात्सव साजरा करण्यास पालिका प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर साथ रोग नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही पालिकेने दिलेला आहे. 

होळी व रंगपंचमी या दिवशी लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. कोरोनाची वाढती संख्या पहाता मुंबईकरांनी यंदा होळी व रंगपंचमी साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे. 

तसेच रंगपंचमीच्या दिवशी गिरगाव, दादर, माहीम, वसोॅवा, जुहू या चौपाट्यांवर विशेष लक्ष असणार आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 



Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget