(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक | मराठी १ नंबर बातम्या

कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक

                                           


                                                                                 मुंबई :भारत सरकारच्या आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक १६ जानेवारी, २०२१ पासून ‘कोविड - १९’ लसीकरण मोहीम कार्यन्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडीया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर दिनांक १५ मार्च, २०२१ पासुन ‘भारत बायोटेक’ या कंपनी निर्मित ‘को-व्हॅक्सीन’ ही लस वापरण्यासाठी भारत सरकारची मंजुरी प्राप्त झाली आहे.  तसेच या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसी देखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सध्या सदर दोन्ही प्रकारच्या लसी मुंबईसह देशात वापरण्यात येत असुन दोन्ही लसी परिणामकारक आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसुन, सदर दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्यावा.

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड - १९’ या आजाराचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढत असून या दृष्टीने प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे विविध स्तरीय उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे हा देखील याच उपाययोजनांचा एक भाग आहे. मात्र, लस घेतलेली असो किंवा अद्याप घ्यावयाची बाकी असो, या दोन्ही बाबत सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांची परिपूर्ण व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, निर्जंतुकीकरण द्राव्याचा (सॅनिटायझर) उपयोग करणे किंवा वारंवार हात धुणे या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

..

तसेच कोविड - १९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे ज्यांना कोविड बाधा झाली आहे, अशा व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण - अलगीकरण करणे देखील गरजेचे आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे.  

===



Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget