मुंबई : भांडपू पूर्व येथील चामुंडानगर नाल्यावरील पूल,मेमन कॉलेज नाल्यावरील पूल व हेमा पार्क जवळील नाल्यावरील पूल असे तीन पुल धोकादायक असल्याने ते पुन्हा पाडून बनविण्यात येणार असून यासाठी पालिकेने २९ कोटी ३५ लाख ११ हजार ८७९ रूपयांचा ठेका मे ए.पी.आय.सिव्हीलकॉन प्रा.लि. कंपनीला देण्याचा प्रस्ताव बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
भांडूप येथील एस विभागातील ब्रीमस्टोवॅड अहवालानुसार उषानगर नाल्यावरील धोकादायक तीन पुलांचे निष्कासन करून ते पुन्हा बांधले जाणार आहेत. एस विभागातील भांडूप पूर्व येथील तीन पुलांच्या भिंती व धारणस्तंभ अत्यंत खराब स्थितीत असल्याने ते पूर्णपणे निष्कासित करून त्याची पुर्नबांधणी करणे गरजेचे होते.
टिप्पणी पोस्ट करा