(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मालमत्ता कर वेळेत न भरल्यामुळे ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणीची धडक कारवाई | मराठी १ नंबर बातम्या

मालमत्ता कर वेळेत न भरल्यामुळे ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणीची धडक कारवाई



२१० कोटी रुपये थकविणाऱ्या ४२ भूखंडाची लिलाव प्रक्रिया सुरु

अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणारा 'मालमत्ता कर' नागरिकांनी वेळेत महापालिकेकडे जमा करावा, यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसात सुरू केलेला कारवायांचा धडाका सुरुच असून महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कठोर ‌कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ४७९ ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी वाहन जप्तीसह, कार्यालयातील वस्तूंचीही जप्ती करण्यात आली असून ४२ भुखंड प्रकरणी लिलाव विषयक प्रक्रिया सुरू करण्यात आली  आहे.या लिलाव प्रकरणी महापालिकेस २१०कोटी रुपये इतके येणे आहे.यात प्रामुख्याने मे. सुमेर  असोसिएटर यांच्याकडे ५३. ४३ कोटी, मे. सुमेर बिल्डर प्रा . लि कडे २९.७१ कोटी , मे.लोखंडवाला कोठारीयाकडे १३.५५ कोटी ,वंडरव्हॅल्यू रियलिटी डेव्हलपर लिमिटेडकडे १४. ६५ कोटी थकित आहेत. अशा  सर्वांकडून वसुलीची प्रक्रिया त्यांचा भूखंडाचा लिलाव करून  वसूल करण्यासाठीची  प्रक्रिया सुरू केलेली आहे.

..

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य असून आज पर्यंत रुपये ३ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. सध्या सुरु असलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून त्यानंतरच्या टप्प्यात नोटीस देण्यात येत आहे. मात्र, जे मालमत्ता धारक वारंवार विनंती करुन व नोटीस पाठवून देखील मालमत्ता कर रकमेचा भरणा करत नाहीत, त्यांच्याबाबत नाईलाजाने जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने - वातानुकूलन यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करणे यासारखी अप्रिय कारवाई करण्यात येत आहे.

..

वरील नुसार अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

..

वरील नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या कारवायांपैकी काही महत्त्वाच्या कारवायांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

..

१. 'एच पूर्व' विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरात असणाऱ्या मे. एमआयजी सहकारी गृहरचना संस्था (विकासक मे. डी.‌बी. रिऍलिटी) यांच्यावर ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन व नोटीस बजावून देखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित मालमत्ता धारकाचे वाहन‌ जप्त व स्थानबद्ध करण्यात आले आहे.


२. 'एच पूर्व' विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरातील एका‌ बहुमज़ली इमारतीत मे. महाराष्ट्र थिएटर प्रा. लि.(मे. आर एन ए काॅर्पोरेट) यांचे कार्यालय आहे. सदर मालमत्ता धारकांकडे रुपये २१ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी होती. सदर बाबत वारंवार विनंती करुन व नोटीस बजावून देखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. या अनुषंगाने सदर मालमत्ता धारकांच्या आठव्या मजल्यावरील कार्यालयातील साहित्य जप्त करण्यासह त्यांच्या अखत्यारीतील तळमजल्यावर अटकावणीची (Sealing) कार्यवाही करण्यात आली आहे.

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget