(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वांद्रे-कुर्ला संकुलातील पालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

वांद्रे-कुर्ला संकुलातील पालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट


मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्राला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत लसीकरणाबाबत चर्चा केली.

याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर, वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो  कोविड समर्पित रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधतांना यावेळी म्हणाल्या की, आपल्या सहकार्यामुळे या केंद्रावर दुपारी एक वाजेपर्यंत ६० वर्षावरील ९७७ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे महापौरांनी सांगितले. लसीकरणानंतर आपल्याला दिलेल्या वेळेपर्यंत तसेच आवश्यकता असेल तर आणखी काही वेळ आपण या ठिकाणी शांततेत बसू शकता. तसेच घरी गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर आपल्याला दिलेल्या फॉर्मवर  हेल्पलाईन क्रमांक दिलेला असून या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपण महापालिकेकडे कधीही मदत मागू शकता. तसेच घरी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धावपळ न करता आराम करून स्वतःची काळजी घेण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली.

यावेळी  लसीकरण झालेल्या काही नागरिकांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाचे अत्यंत चांगले नियोजन केले असून याठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था अत्यंत चांगली असल्याचे बहुतांश नागरिकांनी महापौरांना सांगितले.

******

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget