(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 'बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

'बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


            दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये आनंदी गोपाळ’ आणिताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

            येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. 

बार्डो’ हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

            बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. या चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस कट एलएलपी हे आहेत. याच चित्रपटातील  रान पेटला...’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

             ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रोडक्शन डिझाइन  सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

            राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.ली. यांची निर्मिती आहे.

            ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.  उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कारकस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे.


नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार


            जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

            उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे.

            सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.


स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर


            स्पेशल मेन्शन या श्रेणीत लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

            सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते  ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत. त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत  सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

                                                         ००००

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget