(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय वन‌‌ दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी वनांबाबत समाज माध्यमांद्वारे दिली माहिती | मराठी १ नंबर बातम्या

आंतरराष्ट्रीय वन‌‌ दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी वनांबाबत समाज माध्यमांद्वारे दिली माहिती



*मियावाकी पद्धतीने विकसित नागरी वनांची दिली सातत्यपूर्ण माहिती, पर्यावरण विषयक जाणीव-जागृतीच्या‌ या उपक्रमाचे अनेक मुंबईकरांनी कौतुक*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनात उद्यान‌ विभागाचा उपक्रम*

मुंबई : दिनांक २१ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात येतो. या अंतर्गत विविध प्रकारच्या वनांचे संरक्षण व संवर्धन यासह 'अर्बन फॉरेस्ट' अर्थात 'नागरी वने' यांच्याबाबत देखील जाणीव जागृती करण्यात येते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल च्या माध्यमातून मुंबईतील मियावाकी वनांबाबत सकाळी ६ ते रात्री १०, अशी सलग १६ तास सातत्यपूर्ण माहिती मुंबईकरांना दिली. या संवाद व जाणीव जागृती प्रयोगाचे मुंबईकरांनी देखील उस्फूर्त स्वागत केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.


मुंबईतील नागरीकांना विविध नागरी सेवा सुविधा सातत्यपूर्णरित्या व नियमितपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना अधिकाधिक समृद्ध पर्यावरणात देण्यास देखील सातत्याने प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गेल्या वर्षभरात मुंबईत ४३ मियावाकी वने विकसित करून त्यामध्ये २ लाख २१ हजारांपेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहेत. तर आणखी १५ ठिकाणी नागरी वने विकसित करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विकसित करण्यात आलेली वने, वनांची छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती दिवसभरात महापालिकेने आपल्या  ट्विटर हँडल करून प्रसारित केली, असे या निमित्ताने उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget