(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मालमत्ता करांवर २ टकके दंड आकारण्यास थांबवावे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला तात्पुरते निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

मालमत्ता करांवर २ टकके दंड आकारण्यास थांबवावे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला तात्पुरते निर्देश




मुंबई : मालमत्ता करात २ टकके दंड आकारण्या संदर्भात गट नेत्यांची तातडीची बैठक घेवून यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. तो पर्यंत मालमत्ता करांवर २ टकृके दंड आकारू नये, अधिकाऱ्यांनी निर्णय होईपर्यंत थांबावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीत प्रशासनाला दिले.

मुंबईकरांचा मालमत्ता कर वसूल करतांना पालिका प्रशासन सकती करत आहे. नागरिकांकडून २ टकके दंड वसूल करत आहे. कोविड काळात नागरिकांची अवस्था दयनिय असतांना अशा प्रकारचे नियम लादून नागरिकांना पालिका प्रशासन त्रास देत असल्याचे म्हणत सपाचे गट नेते रईस शेख यांनी हरकतीचा मुदा उपस्थीत केला.

सर्व नगसेवकांनी त्यास पाठिंबा दिला आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरले. उदयोगपतींना सवलत देता आणि नागरिकांना का त्रास देता असे प्रश्न नगरसेवकांनी विचारून प्रशासन अन्यायपूर्ण कारवाई करत असल्याचा आरोप केला.  यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विकासकांकडे ८०० कोटींची थकबाकी असतांना त्यांना सामान्य मुंबईकरच कसा दिसतो? असा सवाल करून प्रशासनाला जाब विचारला.

यावर मालमत्ता करांवर २ टकके दंड आकारण्या संदर्भात गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होई पर्यंत थांबवावे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला तात्पुरते निर्देश दिले आहे.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget