मुंबई : सध्या मॉलमध्ये प्रवेश करताना होणाऱ्या कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये कोविड पॉझिटिव्ह कोणी सापडले तर कॉरंटाईन सेंटर मध्ये पाठविले जात आहे. मात्र ज्यांचे घर वन बीएचके अथवा टू बीचके असेल त्यांना घरीच कॉरंटाईन करण्यास सांगितले जात आहे.
मॉलमध्ये प्रवेश करताना कोविडची रॅपीट अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसेच ज्यांनी कोविडची लस घेतली आहे त्यांना ही टेस्ट करणे बंधनकारक आहे. मॉलच्या प्रवेशद्वारावरच ही टेस्ट केल्यावर दहा ते पंधरा मिनिटांत कोणाला कोरोना आहे की नाही, याचा रिपोर्ट येतो. या रिपोर्टनुसार, ज्यांची टेस्ट निगेटिव्ह असेल त्यांना मॉल मध्ये प्रवेश दिला जातो. ज्यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्यांना प्रवेश दिला जात नाही.
दादर येथील स्टार मॉल येथे प्रवेश करताना कोविडची रॅपीट अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक आहे. ही टेस्ट करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, सकाळी मॉल सुरू होण्यापासून ते मॉल बंद करणाच्या वेळे पर्यंत रॅपीट एटीजन टेस्ट होत असते. आज दिवसभरात दुपारी 3 वाजेपर्यंत 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर सांयकाळी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अशावेळी रुग्णवाहिका बोलावून पॉझिटिव्ह व्यक्ती वा महिलेला कॉरंटाईन सेंटर पाठविले जाते. मात्र ज्यांचे घर मोठे म्हणजे, वन बीएचके या टू बीएचके असेल त्यांना स्वतः च्या घरीच कॉरंटाईन करण्यास सांगितले जाते.
टिप्पणी पोस्ट करा