(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोविड लस | मराठी १ नंबर बातम्या

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोविड लस


        मुंबई :  मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड १९ लसीकरण केंद्रात आज (दिनांक ४ मार्च २०२१) कोविड-१९ लस टोचून घेतली. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोविड लस सुरक्षित असून भयभीत होण्याचे कोणतेही कारण नाही. लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध असून टप्प्या-टप्प्याने लसीकरण सुरळीतरित्या सुरु आहे  . ६० वर्षावरील नागरिकांनी लस घेणे गरजेचे असून ४५ वर्षावरील जोखमींचे आजार असलेल्यांनी सुद्धा आवश्यक ते प्रमाणपत्र सादर करुन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौरांनी यानिमित्ताने केले आहे.

लस म्हणजे कलियुगातील कवचकुंडल असून कोरोना पासून बचाव करण्यासाठी तसेच इतरही बलाढ्य विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले.

    सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक आहे. महानगरपालिकेने सुरु केलेली जम्बो कोविड उपचार केंद्रं देखील कार्यरत असून प्रशासकीय यंत्रणेने कोविड कामकाजामध्ये अजूनही पूर्वीइतकीच तत्परता राखली आहे.  पात्र व्यक्तिंनी लस घेऊन सुरक्षित रहावे, असे आवाहनही  महापौरांनी केले आहे.      

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget