(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाणी टंचाई : स्थायी समितीत पडसाद | मराठी १ नंबर बातम्या

पाणी टंचाई : स्थायी समितीत पडसाद


मुंबई  - मुंबईतील अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. दरवर्षीची ही समस्या कायम असून ती सोडवण्यासाठी प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी झटपट सभा तहकुबी मांडली. भाजप वगळता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष़्ट्रवादी, सपाच्या नगरसेवकांनी सभा तहकूबीला पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले. 

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीत पाणी टंचाईबाबत नगसेवकांनी मांडलेल्या तक्रारी गांभिर्याने घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरेसे आहे, मात्र वितरण व्यवस्था नीट नसल्याची कबूली त्यांनी दिली. संबंधित अधिका-यांकडून तातडीने पाहणी करून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे निय़ोजन केले जाईल, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, खुद्द स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही आपल्या विभागातील पाणी समस्यांचा उल्लेख यावेळी केला. विभागात पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्य़ाने नागरिक हैराण आहेत. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पाणी समस्या निर्माण होत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्यांच्या १७६ प्रभागात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे म्हटले. पुरेसा पाणीसाठा आहे, मात्र प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

------------

एच पूर्व वार्डमध्ये काहींना दोन तास तर काहींना एक तास पाणी पुरवठा केला जातो. गटारातून प्लास्टिकेचे पाईप टाकले जातात, ते पाईप उंदीर, घुशी कुरडत असल्याने पाण्याची गळती होते. त्यामुळे नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी सांगितले.

------------

एल वॉ़र्डमध्ये पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाण्याच्या टाक्यांसाठी निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. केवळ अधिकाऱ्यांकडूनआश्वासन दिले जात असल्याचे भाजपचे नगरसेवक हरिष भादिंगे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. 

------------

म्हाडाच्या वसाहतीत पाणी कमी दाबाने येत असल्याच्या समस्या कायम आहेत. बोरीवली पूर्वेच्या श्रीकृष्ण नगरमध्ये ५० वर्षापूर्वीची जुनी पाईप लाईन आहे. ती कधी ही फुटून धोका निर्माण होऊ शकतो. ती बदलणे आवश्यक आहे. मात्र अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अजूनही तोडगा निघालेला नाही, असे नगरसेविका संध्या जोशी यांनी सांगितले. 

--------

वांद्रे येथील पटेल नगर, गांधीनगर, ज्ञानेश्वर नगर, आदी वसाहतीत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. अधून मधून गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने येथील रहिवाशी त्रस्त आहेत. जेथे पाणी टंचाईबाबत आरडा ओरड होते. तेथे पाणी समस्या दूर केली जात असल्याचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

-------------


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget