(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईत करोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख | मराठी १ नंबर बातम्या

मुंबईत करोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख


आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण 

दिवसभरात आढळले तब्बल २,८७७ नवीन रुग्ण

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात तब्बल २,८७७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी १७ मार्चला २,३७७ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२० मध्ये सर्वाधिक २,८४८ करोना रुग्ण आढळले होते. 

आता करोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाख ५२ हजार ८३५ वर पोहोचल्याने मुंबईत करोना रुग्ण संख्येचा आलेख वाढू लागला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ५५५ वर पोहोचला आहे. 

तर दिवसभरात १,१९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ३ लाख २१ हजार ९४७ रुग्णांनी करोनाला हरवले आहे. सध्या मुंबईत १८,४२४ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget