मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची काल रात्री कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारंटाईन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री आदीत्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, ११ मार्च रोजी मुंबईच्या जे जे रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला ठोस घेतला होता. त्यानंतर १२ दिवसांत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा