मुंबई : महापालिका अर्थसंकल्पावरील भाषणांना १५ मार्च पासून सुरुवात होणार आहे. प्रथेप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याच्या भाषणाने चर्चेला सुरुवात होते. परंतु महापालिका सभागृहात व्हीसीद्वारे भाषण करायचे असेल, तर आपण ते करणार नाही,अशी भूमिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतली आहे. त्यामुळे ही परंपरा खंडित होण्याची भीती व्यकत केली जात आहे.
मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२चा अंदाजित अर्थसंकल्प स्थायी समिती सभेत १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंजूर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी ४ मार्च रोजी तो स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडून आपले विचार भाषणाद्वारे मांडले आहेत.
दरम्यान, मागील एक वर्षापासून कोविडमुळे महापालिकेचे सभागृह होवू शकले नाही. तसेच कोविडमुळे सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पावरही नगरसेवकांना चर्चा करता आलेली नाही. यावेळीही व्हिडीओ कॉन्फरन्सीगंद्वारेच ही अर्थसंकल्पीय चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना केवळ आपली भाषणे वाचून दाखवावीच लागणार आहेत. जर ऐकणारेच कुणी नसतील , तर भाषण कुणासाठी करायचे? असा सवाल नगरसेवक उपस्थित करत आहेत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे होणाऱ्या या चर्चेला जोरदार विरोध होत आहे.
तसेच विधीमंडळाचे अधिवेशन आमदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडले गेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
टिप्पणी पोस्ट करा