(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ड्रिम्स मॉल आगीप्रकरणी सर्वंकष चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश | मराठी १ नंबर बातम्या

ड्रिम्स मॉल आगीप्रकरणी सर्वंकष चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश


*ड्रिम्स मॉल आगीप्रकरणी सर्वंकष चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश*

*महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे  आदेश*

*उपायुक्त प्रभात रहांगदळे करणार चौकशी*

मुंबई : भांडुप येथे ड्रिम्स मॉल व त्यात तिस-या मजल्यावरील सनराईज रुग्णालयामध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना पुढील पंधरा दिवसात सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेची तसेच त्यातील आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करण्याचे आणि त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ह्यांनी दिले आहेत. 

सदर चौकशी करण्यासाठी, मुंबई अग्निशमन दलात कामकाजाचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले विद्यमान उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रहांगदळे यांनी अहवाल सादर करताना विविध मुद्दे विचारात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात, 

१) ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे.

२) मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.

३) अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन ह्यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे.

४) अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे

५) या घटनेच्या अनुषंगाने, इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी सुचवणे.


ह्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश महापालिका  आयुक्त श्री. इ.सिं .चहल ह्यांनी दिले आहेत.

===

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget