(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मनपा कोविड लसीकरण केंद्रांमध्ये महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा | मराठी १ नंबर बातम्या

मनपा कोविड लसीकरण केंद्रांमध्ये महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा*स्वतंत्र लसीकरण व्यवस्थेसह महिलांचे गुलाब पुष्पांनी करण्यात आले स्वागत*

*जागतिक महिला दिनी ५ लसीकरण केंद्रांमध्ये ८,०९२ महिलांनी घेतली लस*

मुंबई : आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील कोविड लसीकरण केंद्रांपैकी ५ ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेव्हन हिल्स रुग्णालय, वांद्रे कुर्ला संकुल जम्बो सुविधा केंद्र, नेस्को गोरेगांव जम्बो सुविधा केंद्र, मुलुंड जम्बो सुविधा केंद्र आणि दहीसर जम्बो सुविधा केंद्र या ५ लसीकरण केंद्रांवर करण्यात आलेल्या स्वतंत्र व्यवस्थेला महिलांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले लसीकरण करवून घेतले. यानुसार सदर पाचही लसीकरण केंद्रांवर आज दिवसभरात ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर अनेक लसीकरण केंद्रांवर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरणासाठी येणा-या महिलांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागतही करण्यात येत होते. तर काही ठिकाणी गुलाबाच्या फुलांसोबतच चॉकलेट, सरबत किंवा नाष्ता अशीही व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी दिली आहे. 

..

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या ‘कोविड – १९’ विषयक लसीकरणाचा तिसरा टप्पा प्रभावीपणे सुरु असून सार्वजनिक रुग्णालयांसह विविध खासगी रुग्णालयांमध्ये व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणारे व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्या व दुस-या टप्प्यात अनुक्रमे वैद्यकीय कर्मचारी व पहिल्या फळीतील कर्मचारी (Frontline Worker) यांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते.

..

आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने लसीकरण केंद्रांवर कोविडची लस घेण्यासाठी येणा-या महिलांसाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. आज दिवसभरात वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात १ हजार ९८२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. या खालोखात गोरेगांव परिसरातील नेस्को जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात आज दिवसभरात १ हजार ९३२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आज दिवसभरात १ हजार ९०८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. दहीसर येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात आज दिवसभरात १ हजार ८५२ महिलांचे लसीकरण करण्यात आले. तर मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रात आज दिवसभरात ४१८ महिलांचे लसीकरण करण्यात आले. यानुसार सदर ५ लसीकरण केंद्रांवर दिवसभरात एकूण ८ हजार ९२ महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

==
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget