मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३३ सार्वजनिक रुग्णालये व ३८ खाजगी रुग्णालये; यानुसार एकूण ७१ रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रात 'कोविड-१९' लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेदरम्यान दि. ८ मार्च २०२१ पर्यंत १,६२,५९८ आरोग्य कर्मचारी, १,११,०७८ कोविड आघाडीवर काम करणारे कर्मचारी, ६० वर्षे व अधिक वयाच्या १,०५,८६७ व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेले ११,३९५ असे एकूण ३,९०,९३८ लाभार्थ्याना कोविड लस देण्यात आली आहे.
..
सर्वसाधारणपणे लसीकरणानंतर सौम्य प्रकारची लक्षणे लाभार्थ्यांमध्ये येतात. उदा. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, हलकासा ताप, अशक्तपणा, चक्कर येणे इ.तसेच आतापर्यंत १६ लाभार्थ्यांना एक किंवा दोन दिवसासाठी रूग्णालयात देखरेखीसाठी दाखल करण्यात आले होते.
..
दि. ०८ मार्च २०२१ रोजी मुबंई महानगरपालिका क्षेत्रातील एका खाजगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात 'कोविड-१९' लसीकरण सुरु असताना वय वर्षे ६८ असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीस (पुरूष) दु. ३.३१ च्या सुमारास कोविशिल्ड ह्या लसीची मात्रा देण्यात आली. लसीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करुन त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले.
..
परंतु दुर्दैवाने सायं. ५.०५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सदर बाब पोलिस यंत्रणेला कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शवविच्छेदनाकरीता जे.जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आले. जेष्ठ नागरिक असणाऱ्या सदर व्यक्तीचे सदर व्यक्तीचे शवविच्छेदन आज e मार्च २०२१ रोजी केले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अत्यंत आवश्यक बाब म्हणून याकरीता लसीकरणानंतर घडणा-या प्रतिकूल घटनेबाबतची चिकित्सा (Causality assessment) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती गठीत करण्यात आली असून समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार असून ही समिती मृत्यू बाबतची कारणमिमांसा करणार आहे .
=
टिप्पणी पोस्ट करा