(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार ; दोषींना निलंबित केले जाणार - महापौर किशोरी पेडणेकर | मराठी १ नंबर बातम्या

ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीची चौकशी करणार ; दोषींना निलंबित केले जाणार - महापौर किशोरी पेडणेकर


मुंबई : भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  याच ड्रीम्स मॉल मध्ये एक रुग्णालय होते. त्यामुळे मॉल मध्ये रुग्णालय कसे आले, कोणत्या परवानग्या घेऊन येथे रुग्णालय सुरू झाले याची चौकशी करतानाच संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, असे कडक पाऊल महापौर किशोरी पेडणेकर उचलणार आहेत.

मॉलला लागलेली आग ही रात्री लागली होती. आग पहिल्या मजल्यावर लागली होती. पहिल्या मजल्यावर रुग्णालय नाही. आगीचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही. मात्र मॉल मधील थर्मोकॉल आणि अन्य ज्वलनशील साहित्यांना आग लागल्याने आग मॉल मध्ये चारीबाजूने पसरली, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.


मॉल मध्ये रुग्णालय करण्यास माझा विरोध होता. नंतर त्यांनी कोणत्या परवानग्या घेऊन रुग्णालय उभारले, ते माहीत नाही. रुग्णालयात 75 रुग्ण होते. त्यातील 10 अतिदक्षता विभागात तर 4 ते 5 वयोवृद्ध रुग्ण ही या रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या आगीची चौकशी करण्यात येणार असून संबंधित दोषींवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  म्हणाल्या की, आगीची घटना समजल्यानंतर काल मध्यरात्री या ठिकाणी भेट देऊन मॉलमध्ये असलेल्या सनराइज रुग्णालयाबाबत विचारणा करून संबंधित कोविड रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्याचे निर्देश दिले.  मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित सनराइज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१  ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी ३१ मार्च  २०२१ पर्यंत रुग्णालय  बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्‍यानंतर कोविडची  रुग्णसंख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा  सुरू झाले होते. आग ही मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती जोमाने वाढून वर कोविड सेंटरपर्यंत जाऊन पसरली. त्यातून ही दुर्घटना घडली असून या ठिकाणी अग्नीसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यापूर्वी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच सर्व कोविड सेंटरमधील फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीचा दोन दिवसात संपूर्ण अहवाल आल्यानंतरच यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget