(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोविन संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी प्रतीक्षा न करता नजीकच्या रुग्णालयात थेट जाऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घ्यावी | मराठी १ नंबर बातम्या

कोविन संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी प्रतीक्षा न करता नजीकच्या रुग्णालयात थेट जाऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घ्यावी


*नोंदणी केली नसल्यास रुग्णालयात जाऊन, नोंदणी करुन लस घेण्याचीही मुभा*

*बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन*

*मुंबईत शासकीय, मनपा रुग्णालयांसह ५९ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सोय*

मुंबई : कोविड-१९ संसर्गजन्य आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर, पात्र नागरिकांना लस घेता यावी, यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत महानगरपालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये नि:शुल्क तर सद्यस्थितीत एकूण ५९ खासगी रुग्णालयांमध्येही रुपये २५० या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. कोविन ॲपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरी नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. 

भारतात व मुंबईत कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्‍याच्या प्रतिबंधासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना कार्यान्वित केलेल्या आहेत. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे विलगीकरण-अलगीकरण करण्यासह सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायजर) चा उपयोग करणे किंवा हात वारंवार धुणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 

यासोबतच आता कोविड-१९ प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाली असून आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सदर लसीकरणाचा वेग वाढविणे अनिवार्य आहे. या संदर्भात शासनाने ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या आहेत. 

या अनुषंगाने नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील नमूद वयोगटातील लाभार्थ्यांनी “कोविन” या संकेतस्थळावर यशस्वी नोंदणी करुन याद्वारे घेण्यात आलेल्या लसीकरणाच्या दिनांकाची वाट न पाहता नजीकच्या लसीकरण केंद्रात थेट जाऊन कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घ्यावी. 

तसेच, ज्या पात्र नागरिकांनी कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी केली नसेल, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी आणि त्यानंतर त्यांनी तेथेच लस घ्यावी. नोंदणी व लसीकरण या दोन्ही प्रक्रिया विचारात घेता, त्यासाठी थोडा अवधी लागू शकतो.

सदर लसीकरण महानगरपालिका अथवा शासनाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नि:शुल्क तर खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात सशुल्क रुपये २५०/- या दराने उपलब्ध आहे.



मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

१. जसलोक रुग्णालय

२. एच. एन. रिलायन्स रुग्णालय

३. सैफी रुग्णालय

४. ब्रीचकँडी रुग्णालय

५. भाटिया रुग्णालय

६. व्होकहार्ट रुग्णालय

७. एल.एच. हिरानंदानी रुग्णालय

८. बॉम्बे रुग्णालय

९. ग्लोबल रुग्णालय

१०. हिंदुजा रुग्णालय

११. लीलावती रुग्णालय

१२. नानावटी रुग्णालय

१३. कोकिळाबेन रुग्णालय

१४. एस. एल. रहेजा रुग्णालय

१५. फोर्टिस रुग्णालय, मुलुंड

१६. होली फॅमिली रुग्णालय

१७. इनलॅक्स सर्वसाधारण रुग्णालय

१८. बी. डी. पेटीट पारसी रुग्णालय

१९. एच. जे. दोशी वैद्यकीय महाविद्यालय, शीव (सायन)

२०. के. जे. सोमैय्या वैद्यकीय महाविद्यालय, शीव (सायन)

२१. एस. आर. सी. सी. चिल्ड्रन हॉस्पिटल, महालक्ष्मी

२२. लाईफ लाईन रुग्णालय, गोरेगांव

२३. पारख रुग्णालय, घाटकोपर

२४. लायन ताराचंद बाप्पा रुग्णालय, शीव (सायन)

२५. मिल्लत डायलेसिस सेंटर, अंधेरी

२६. शुश्रुत रुग्णालय, चेंबूर

२७. सुराणा सेठिया रुग्णालय, चेंबूर

२८. शांतिनिकेतन रुग्णालय, घाटकोपर

२९. बालाजी रुग्णालय, भायखळा

३०. बालाजी रुग्णालय, मालाड

३१. होली स्पिरीट रुग्णालय

३२. सर्वोदय रुग्णालय

३३. करुणा रुग्णालय

३४. एशियन हार्ट इन्स्टिट्यूट

३५. प्रिन्स अलीखान रुग्णालय

३६. मित्तल रुग्णालय

३७. मसिना रुग्णालय

३८. गुरुनानक रुग्णालय

३९. संजीवनी रुग्णालय

४०. थुंगा रुग्णालय

४१. ऑस्कर रुग्णालय

४२. कोहिनूर रुग्णालय

४३. एस. आर. व्ही. रुग्णालय

४४. गोदरेज रुग्णालय 

४५. सनराईज रुग्णालय

४६. क्रिटिकेअर रुग्णालय

४७. सूर्या रुग्णालय

४८. सपना हेल्थ केअर, घाटकोपर

४९. रिध्दीविनायक रुग्णालय, मालाड

५०. सुराणा रुग्णालय, मालाड

५१. शिवम् रुग्णालय, कांदिवली

५२. डॉ. मिनाज रुग्णालय, भांडूप

५३. भाटिया रुग्णालय, भांडूप

५४. प्लॅटिनम रुग्णालय, भांडूप

५५. एन. वाडिया रुग्णालय, परळ

५६. राणे रुग्णालय, चेंबूर

५७. मल्लिका रुग्णालय, जोगेश्वरी

५८. एच. सी. जी. अपेक्स कॅन्सर सेंटर

५९. लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय

*****


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget