मुंबई : दहिसरमध्ये राहणाऱ्या कुमारी सायली आयरे हिने मिस टीन मल्टिनॅशनल इंडिया 2021 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. हा पुरस्कार जिंकून सायली हिने दहिसरकरांचे नाव उज्ज्वल केल्याचे सांगत शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी कुमारी सायली आयरे हिचा शाल व सन्मानचिन्ह देऊन काल सत्कार केला. याप्रसंगी माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे तसेच सायली हिचे कुटुंबीय उपस्थित होते. यापूर्वी तिने मिस्टर टीव्ही मल्टी नॅशनल इंडिया 2020 स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते. सायली हिचा जन्म मुंबईत झाला असून ती सध्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी. टेकचा अभ्यास करत आहे. तिने विविध राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच जिम्नास्टिक व टेबल टेनिसचा या खेळांमध्ये तिने विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्याचबरोबर चित्रकला आणि नृत्य स्पर्धेमध्ये तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. ती सध्या महाविद्यालयातील इंडस्ट्री रिलेशन्स सेलचे अध्यक्षपदही भूषवित आहे. तसेच एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेमध्ये सायली सध्या कार्यरत आहे . दरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून त्यामध्ये विजेतेपद मिळविण्याचा मनोदय सायलीने यावेळी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा