मुंबई : गर्दी मुळे कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. दादर येथील भाजी व फुल मार्केट मध्ये पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेपर्यंत खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दादर येथील भाजी व फुल मार्केट बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहे. याबाबत आज मुंबई पोलीस सह आयुक्त यांच्या बरोबर महापौर दालनात बैठक झाली असून स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा करुन हलवण्यात येणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
दादर येथील मार्केट मध्ये गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील अन्य मार्केट मध्ये गर्दी होत असल्याचे निदर्शनास येताच त्या ठिकाणच्या मार्केटबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा