मुंबई, दि.१३ : नागपाडा येथे म्हाडाच्या धोकादायक इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळण्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार, नागपाडा, मोरलॅड रोड, परेबीया हाॅटेल जवळील म्हाडाची धोकादायक पाचमजली 'सिराज मंजील' चा मोठा भाग शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. सुदैवाने ही इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. म्हाडाने ही इमारत सी - १ म्हणून धोकादायक जाहीर केली होती. त्यामुळे ही इमारत अगोदरच रिकामी करण्यात आली होती.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला. तर पालिका वार्ड कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
टिप्पणी पोस्ट करा