(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्राणवायुच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून होणार देखरेख | मराठी १ नंबर बातम्या

प्राणवायुच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून होणार देखरेख

*प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी ‘मिशन मोड’ वर कार्यवाही करावी

*महानगरपालिका आयुक्त चहल यांचे प्राणवायू उत्पादक, पुरवठादार यांना निर्देश

*प्राणवायुच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून होणार देखरेख

*प्राणवायू अभावी कोणताही अनुचित प्रसंग ओढवू नये, यासाठी यंत्रणा सतर्क

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील महानगरपालिकेच्या व सर्व खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामकाज करीत असून त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी १६८ रुग्णांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करता आले. प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दैनंदिन प्राणवायू वितरण प्रणालीमध्ये अचूकता राखण्यासाठी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाने देखरेख करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना शनिवार, दिनांक १७ एप्रिल, २०२१ रोजी प्राणवायू उपलब्ध असलेल्या महानगरपालिका रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रतता व समन्वय साधण्यासाठी महानगरपालिका आयुक्त चहल यांनी आज (दिनांक १९ एप्रिल, २०२१) दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, सर्वश्री संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते. 

 बैठकीच्या प्रारंभीच आयुक्त चहल यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणेचे रुग्ण स्थलांतर सुरक्षित पद्धतीने केल्याबद्दल कौतुक करत अभिनंदन केले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांची ने-आण करताना महानगरपालिकेच्या यंत्रणेने जो समन्वय राखला, तो अभूतपूर्व पद्धतीचा होता आणि ही सर्व कार्यवाही एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हती, असे सांगताना चहल भावनाविवश देखील झाले.

पुढे ते म्हणाले की, कोविड रुग्णांसाठी प्राणवायुची गरज सर्वत्र निर्माण झाली असून मुंबई त्याला अपवाद नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्यावर असलेला ताण समजण्यासारखा आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये. प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज मागणीच्या तुलनेत किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना चहल यांनी केली. त्यावर सहमती दर्शवत अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांनी सांगितले की, या कामी महानगरपालिकेच्या यंत्रणेला अन्न व औषध प्रशासनाकडून देखील आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. 

बैठकीत सहभागी झालेल्या प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर आयुक्त चहल यांनी नमूद केले की, मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा प्राणवायू साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल. तथापि, तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील मिशन मोडवर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱयांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. प्राणवायुच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देशही चहल यांनी यावेळी दिले.     

*****

प्राणवायू पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामकाज करीत असून त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी १६८ रुग्णांना सुरक्षितरित्या स्थलांतरित करता आले. प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दैनंदिन प्राणवायू वितरण प्रणालीमध्ये अचूकता राखण्यासाठी गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाने देखरेख करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ रुग्णालयातील १६८ रुग्णांना शनिवार, दिनांक १७ एप्रिल, २०२१ रोजी प्राणवायू उपलब्ध असलेल्या महानगरपालिका रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रतता व समन्वय साधण्यासाठी महानगरपालिका आयुक्त चहल यांनी आज (दिनांक १९ एप्रिल, २०२१) दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे, सर्वश्री संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते. 

 बैठकीच्या प्रारंभीच आयुक्त चहल यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणेचे रुग्ण स्थलांतर सुरक्षित पद्धतीने केल्याबद्दल कौतुक करत अभिनंदन केले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांची ने-आण करताना महानगरपालिकेच्या यंत्रणेने जो समन्वय राखला, तो अभूतपूर्व पद्धतीचा होता आणि ही सर्व कार्यवाही एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हती, असे सांगताना चहल भावनाविवश देखील झाले.

पुढे ते म्हणाले की, कोविड रुग्णांसाठी प्राणवायुची गरज सर्वत्र निर्माण झाली असून मुंबई त्याला अपवाद नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्यावर असलेला ताण समजण्यासारखा आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये. प्राणवायू उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला प्राणवायू साठा किती त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज मागणीच्या तुलनेत किती प्राणवायू मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशी सूचना चहल यांनी केली. त्यावर सहमती दर्शवत अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांनी सांगितले की, या कामी महानगरपालिकेच्या यंत्रणेला अन्न व औषध प्रशासनाकडून देखील आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. 

बैठकीत सहभागी झालेल्या प्राणवायू उत्पादक व पुरवठादार यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर आयुक्त श्री. चहल यांनी नमूद केले की, मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा प्राणवायू साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल. तथापि, तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील मिशन मोडवर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱयांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. प्राणवायुच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देशही चहल यांनी यावेळी दिले.     

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget