(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कांदिवली येथील लसीकरण केंद्राचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घघाटन | मराठी १ नंबर बातम्या

कांदिवली येथील लसीकरण केंद्राचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घघाटन *दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरला महापौरांची भेट

 *आर/उत्तर विभागातील वाँर रूमच्या तक्रारीचा महापौरांनी घेतला आढावा

मुंबई : स्थानिक नगरसेविका माधुरी भोईर यांच्या पुढाकाराने  सुरू करण्यात आलेल्या कांदिवली येथील  लसीकरण केंद्राचे उद्घघाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी पार पडले. 

याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे,  शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका सुजाता पाटेकर, शीतल म्हात्रे,नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, मेघा भोईर व सुजाता सिंगाडे उपस्थित होत्या.


महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, नगरसेविका माधुरी भोईर यांच्या प्रयत्नामुळे कांदिवली विभागातील नागरिकांना लसीकरणाची चांगली सोय उपलब्ध झाली असून नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. तसेच लसीकरणानंतर काही त्रास जाणवल्यास  दिलेल्या तक्रार क्रमांकावर भ्रमणध्वनी करावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. तसेच कोरोना काळात आलेला प्रत्येक दूरध्वनी हा उचललाच गेला पाहिजे. तसेच  याबाबत नागरिकांच्या माझ्याकडे काही तक्रारी आल्यास मी संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. वाँर रूमला आलेल्या दूरध्वनीनुसार संबंधित रुग्णाला उपलब्ध असलेल्या ठिकाणी बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. तसेच रुग्णांनी आपल्या आवडीनुसार रुग्णालयाची मागणी न करता ज्या ठिकाणी बेड उपलब्ध होत असेल त्या ठिकाणी तातडीने उपचार घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.


त्यानंतर  आर /उत्तर विभागातील दहिसर जम्बो कोविड सेंटरला महापौरांनी भेट देऊन येथील ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेतला. तसेच डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत चर्चा केली.

********

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget