(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); "प्लाझ्मा वा रक्तदान करून आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. आज याचीच खरी गरज आहे" - शौर्यवीर मयूर शेळके | मराठी १ नंबर बातम्या

"प्लाझ्मा वा रक्तदान करून आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. आज याचीच खरी गरज आहे" - शौर्यवीर मयूर शेळके


मुंबई : "मी केलेले धाडसी कृत्य इतरांना जमेलचं असे काही सांगू शकत नाही. पण आज कोरोना महामारीत प्लाझ्मा वा रक्तदान करून आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. आज याचीच खरी गरज आहे", असा लाखमोलाचा संदेश शौर्यवीर मयूर शेळके यांनी दिला आहे.

वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव मयूर शेळके याने वाचवला. यासाठी मयूर शेळकेंचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

मयूरच्या या कार्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून मयूरचं कौतुक केले. मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही मयूर शेळके याच्या धाडसाचे कौतुक केले.

आज सर्व स्तरातून मयूरचे कौतुक होत आहे. मराठी १ नंबर बातम्याने मयूर शेळके याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याच्याशी बातचीत केली असता तो म्हणाला की, मला बक्षिस स्वरूपात मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम त्या अंध मातेला देणार आहे. 

रेल्वे बोर्डाकडून 50 हजार रुपयांचे बक्षिस मयूर शेळके याला  जाहीर करण्यात आलेले आहे. या  बक्षिस पत्रातील अर्धी 25 हजार रक्कम मयूर त्या अंध मातेला देणार आहे.

मयूरने स्वतः च्या जीवाची बाजी लावत एका चिमुकल्याचे प्राण वाचवून तो सर्वांचा "खरा हिरो" ठरला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यांनी सर्वांना एक लाखमोलाचा संदेश दिला आहे.

"मी केलेले धाडसी कृत्य इतरांना जमेलचं असे काही सांगू शकत नाही. पण आज कोरोना महामारीत प्लाझ्मा वा रक्तदान करून आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो. आज याचीच खरी गरज आहे" 

- शौर्यवीर मयूर शेळके


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget