मुंबई : सध्याच्या लॉकडाऊन कालावधीत कलाशिक्षक मनोहर बाविस्कर ( माळी ) यांनी 300 रंगीत सुंदर बोलके फळे तयार केली आहेत.
सध्या कोरोना महामारी आजाराममुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शाळा - महाविद्यालय बंद आहेत. या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी आपण काहीतरी नवनवीन प्रयोग प्रकल्प केले पाहिजेत. कलाशिक्षक बाविस्कर यांनी गेल्या दोन महिन्यापासून रोज सात ते आठ तास विविध सुंदर बोलके फळे रंगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
त्यांनी जे फलकलेखन केले आहे त्यात फक्त अक्षरलेखन न करता त्यात नाविन्य पद्धतीने आपल्या महापुरूषांची चित्र रंगीत खडुच्या सहाय्याने रेखाटताना त्यांचे कार्य, सामाजिक प्रश्न, भारतीय सण, उत्सव, परंपरा यांचे ही चित्रमय रेखाटन करून त्याद्वारे सुसंदेश दिले आहेत. सुसंदेश देताना विविध टाईप मध्ये अक्षरलेखन करून फलक सजावट करण्याची अनोखी पध्दत बाविस्कर यांनी शोधली आहे.
या अनोख्या शालेय फलकलेखन व चित्र रेखाटनातून विद्यार्थी व पालक प्रभावीत होऊन त्यांनी बोध घ्यावा. याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न बाविस्कर यांनी केला आहे.
आमचे वर्गशिक्षक आम्हाला सुंदर फलक लेखन करून दाखवत असे व चित्रही काढून दाखवत असे. त्या वेळेस मला उभे करुन सुंदर फलक लेखन मी स्वतः करत होतो. यांच्या सुंदर फलकलेखनामुळे माझ्यावर कळत-नकळत संस्कार झाल्याचे त्यांनी सांगितले.
मला लहानपणापासूनच रेखाटन चित्रकला व हस्ताक्षर याची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षापासून साईन बोर्ड पेंटिंग बॅनर तयार करून या माध्यमातून मी अक्षराचे वळण शिकत होतो, यामुळे माझ्या कलेला चालना मिळाली, माझ्या अक्षरांना सुंदरता मिळाली व ज्या फळ्यामुळे मीही आज शिक्षक होऊ शकलो, तेच संस्कार आज मी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेतील फळ्यातून देत आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा