(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा भाई जगताप यांनी केला आरोप | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्राला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा भाई जगताप यांनी केला आरोप


मुंबई : महाराष्ट्राला केंद्र सरकार लस पुरवठा करण्यात हात आखडाता घेत आहे. लस पुरवठा करताना महाराष्ट्राला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

आज देशात कोरोनामुळे हालाखीची स्थिती निर्माण झालेली असताना, देशाला खरी गरज कोरोना लसीची असताना, देशाचे पंतप्रधान पाकिस्तानला मोफत लस देत आहेत. यातून ते काय साध्य करू इच्छितात, असा सवाल त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्र राज्यात आज दीड दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक असताना केंद्र सरकार लस पुरवठा करण्यात हात आखडाता घेत आहे. लस पुरवठा करताना महाराष्ट्राला केंद्र सरकार सापत्नाची वागणूक देत असल्याचे ते म्हणाले.

१० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित करणार

कोरोनाचा फटका नागरिकांना बसत असून मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस रक्तदान शिबीरे आयोजित करून १० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित करणार आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते १२ एप्रिल पासून ठिकठिकाणी रकतदान शिबीरे आयोजित करून हे रक्त संकलित करून सरकारी रक्त पेढयांना देणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. 

नियम आखून व्यापाऱ्यांना ही व्यापार करण्यास द्यावे

सध्याच्या अंशत: लॉकडाउनचा फटका व्यापाऱ्यांना बसत असून त्यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशावेळी ऑनलाईन मार्केट प्रमाणे अन्य व्यापाऱ्यांना ही नियम आखून त्यांना ही व्यापार करण्याची सरकारने मुभा द्यावी, अशी मागणी मी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. रोजगार वाचला पाहिजे आणि कामगारही टिकला पाहिजे या धोरणानुसार कारभार केला जावा अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. 

झे ७१ सरफेस सॅनिटायझर वापर करावा 

मागील कोविडच्या काळात मुंबई महापालिका प्रशासनाने झे ७१ सरफेस सॅनिटायझर आयात करून जी उत्तर व जी दक्षिण विभागात त्याचा प्रथम वापर शौचालय मध्ये केला. सदर सॅनिटायझरचा प्रभाव 1 महिना असतो. या सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे वरळी, धारावी विभागात कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला. त्यानंतर सर्व प्रभागांमध्ये याचा वापर करण्यात आला. आता आलेल्या कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने या सॅनिटायझरचा वापर सर्व चाळीतील आणि सार्वजनिक शौचालयमध्ये करून कोरोनाचा प्रभाव कमी करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती यावेळी भाई जगताप यांनी दिली.

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget