(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांँन्टला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांँन्टला महापौर किशोरी पेडणेकर यांची भेटमुंबई : नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकची गळती होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा प्राण गेल्याच्या दुर्देवी घटनेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतीने दखल घेऊन आज दि.२२ एप्रिल २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सीजन प्लांँन्टला भेट देऊन येथील सुरक्षितता व घ्यावयाची खबरदारी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

    याप्रसंगी नगरसेविका हेमांगी वरळीकर, सान्वी तांडेल, नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथील जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता हर्षवर्धन टिकले,वांद्रे येथील जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता रराजेश डेरे उपस्थित होते.

 महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्वप्रथम नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया व वांद्रे येथील जम्बो कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या की, अश्या प्रकारच्या कुठल्याही  दुर्घटनेत रुग्णांचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्या सर्व कोविड रुग्णालयातील मेडिकल ऑक्सीजन प्लांँन्टची पाहणी करत असल्याचे महापौरांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड रुग्णालयातील मेडिकल ऑक्सिजन प्लांँन्टची सुरक्षा व खबरदारी याला प्रथम प्राधान्य देत असल्याचे महापौरांनी सांगितले. मेडिकल ऑक्सीजन घेऊन येणाऱ्या गाडीचा प्रशिक्षित वाहन चालक हा सर्वप्रथम या प्लांँन्टची तपासणी करून नंतरच ऑक्सिजन भरत असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच या ठिकाणी महापालिकेच्या मेडिकल ऑक्सीजन प्लांँन्टवर कंपनीचे दोन गॅस ऑपरेटर, दोन अभियंता तसेच महापालिकेचे अभियंता या सर्व कामांची सुसूत्रता व नियोजन करीत असून काही अडचणी उद्भवल्यास दोन्हीही ठिकाणी बॅकअप प्लांँन्ट व डयूरा ऑक्सिजन सिलेंडर तयार ठेवण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.वरळी येथील प्लांँन्टची क्षमता ही सहा ते सात हजार लिटर मेडिकल ऑक्सिजनची असून  वांद्रे येथील मेडिकल ऑक्सिजनची प्लांँन्टची क्षमता ही  ६०  हजार लिटरची आहे. त्यासोबतच वांद्रे येथे ८० सिलेंडर बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. दोन्हीही ठिकाणी मुख्य प्लांँन्टला काही बिघाड झाल्यानंतरही दोन दिवस ऑक्सिजन पुरेल इतकी क्षमता असल्याचे महापौरांनी सांगितले. या ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये, तसेच भविष्यकाळात याप्रकारच्या दुर्घटना घडू नये, यासाठी अधिक सजग व दक्ष राहण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

*****

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget