मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी निर्णय दिला होता. त्याच अनुषंगाने महापालिकेतील महाविकास आघाडीने बहुमतावर केलेल्या ठरावाच्या विरोधात भालचंद्र शिरसाट यांनी केलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय देताना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने महापालिकेचा ठराव रद्द करीत भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय सोमवारी दिला.
भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबत बोलताना असे प्रतिपादन केले की, न्यायालयाने भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम ठेवण्याचा दिलेला निर्णय म्हणजे शिवसेनेच्या मनमानी, द्वेषपूर्ण कारभाराला चपराक असून लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणारा आहे.
भालचंद्र शिरसाट यांच्या याचिकेवर काॅऊंन्सिलर अॅड. अमोघ सिंग आणि अॅड. जीत गांधी यांनी न्यायालयात बाजू समर्थपणे मांडली.
टिप्पणी पोस्ट करा