(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हाफकिनला कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

हाफकिनला कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता



मुंबई : हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-19 या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये 154 कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल.

            प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये 94 कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये 65 कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

----------------

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget